दादर : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या (Dadar) शुभमुहूर्तावर दरवर्षी गेले 30 वर्ष दुर्गराज रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा राजाभिषेक सोहळा यशस्वीरीत्या संपन्न होतो. या जाणिवेतून 28 जुलै रोजी दादर येथे श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड तर्फे कष्ट करणाऱ्या मावळ्यांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी समितीच्या वतीने दूर्गतपस्वी, ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांना ‘शिवसन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हा सोहळा 28 जुलै रोजी (Dadar) सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगटीवार, आमदार सदा सरवणकर, आमदार भरतशेठ गोगावले, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, रणजीत सावरकर, आणि श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांची उपस्थिती लाभणार आहे.

महाडच्या दादली पुलाचे पूर सदृश्य दृश्य
तिथीनुसार राज्याभिषेक म्हणजेच पावसाची शक्यता दाट असते. अशा वेळी ऊन-वारा-पावसाची तमा न करता श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड या संस्थेचे कार्यकर्ते हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दरवर्षी कष्ट घेतात. त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
Thane : ठाण्यातील शाळांना तात्काळ सुट्टी जाहीर; अतिवृष्टीचा इशारा
या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 98705 99940, 9619522649 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.