ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. भातसा व चोरणा या नद्यांच्या संगमावर वसलेल्या या धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आज सकाळी 8 वाजता भातसा धरणाच्या पाणी पातळीमध्ये 131.81 मी. एवढी वाढ झाली. पाण्याचा हा वाढता प्रवाह पाहता भातसा धरणाचा विसर्ग प्रवाहित करण्यात येणार असल्याची शक्यता भातसा धरण व्यवस्थापकांकडून वर्तवण्यात आली आहे.
तर वाढता प्रवाह पाहता धरणाची वक्रद्वारे देखील काही दिवसांत उघडण्यात येणार आहे. यामुळे भातसा धरणाच्या आजूबाजूस असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याची पातळी वाढली असल्याने कोणीही नदी पात्र ओलांडू नये असे आवाहन देखील (Thane) भातसा धरण व्यवस्थापकांकडून करण्यात आले आहे.