नवी मुंबई : बेलापूरच्या सेक्टर 19 मधील शहाबाज गावात आज पहाटे तीन (Navi Mumbai) मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या इमारतीत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण अडकल्याची शक्यता आहे. पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू आहे. 50 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनी सांगितले की, पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. शाहबाज गाव बेलापूर प्रभागांतर्गत येते. या इमारतीत 13 फ्लॅट होते. दोन जणांना वाचवण्यात यश आले असून दोन जण अडकल्याची भीती आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.
या दुर्घटनेची मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. इमारत दुर्घटनेत सापडलेल्या आपत्तीग्रस्तांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.
बचावलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल केले-
सुटका करण्यात आलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत (Navi Mumbai) आहे. ही 10 वर्षे जुनी इमारत असल्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी सांगितले. सध्या तपास सुरू आहे. आठवड्याभरापूर्वी दक्षिण मुंबईतील एका चार मजली निवासी इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळून एका 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता, तर चार जण जखमी झाले होते.