धारावी : मारहाण केली म्हणून वस्तीत पोलिस घेऊन(Dharavi) येणाऱ्या तरुणाची पोलिसांसमोरच निर्घृणपणे हत्या करण्यात आली. भर रस्त्यात त्याच्यावर वार करून त्याची हत्या करण्यात आली. मृत झालेल्या तरुणाचे नाव अरविंद वैश्य असून तो केवळ 25 वर्षांचा होता. तर अल्लू, आरिफ, शुभम शेर अली यांनी ही हत्या केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे पोलिसांच्या समोरच या तरुणाची हत्या करण्यात आली.
धारावीतील मदिना कंपाऊंडमध्ये सोमवारी सकाळी गोळीबार झाला तर रविवारी रात्री राजीव नगरमध्ये खुनाची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना राजीव नगर येथील आहे. दोन्ही पक्षातील भांडण थांबवण्यासाठी गेलेल्या अरविंद वैश्य यांची काही लोकांनी मिळून हत्या केल्याचा आरोप आहे. अरविंदचा भाऊ शैलेंद्र वैश्य याने दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री सातच्या सुमारास अरविंदचा मित्र सिद्धेश आणि त्याच्या वडीलासोबत सोबत अल्लू, आरिफ, शुभम शेर अली यांचे भांडण झाले.
Kiwale : ‘ब्लू व्हेल’सारख्या गेमने घेतला 16 वर्षाच्या मुलाचा बळी; इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
हे भांडण मिटवण्यासाठी अरविंदने मध्यस्थी केली. या कारणाने सिद्धेश, त्याचे वडील आणि अरविंद याला अल्लू आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. याबाबत तक्रार करण्यासाठी अरविंद मित्रासोबत दुचाकीवरून धारावी पोलिस ठाण्यात गेला. मागून सद्दाम आणि जुम्मनही गेले, त्यांनी केस मागे घेण्यासाठी पोलिसांसमोरच अरविंदला धमक्या देण्यास सुरुवात केली. तसे न केल्यास परिणामांना सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले आणि तेथून परत आले.
मात्र, पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या पोलिस निरीक्षकाने (Dharavi) सद्दाम आणि जुम्मन यांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करून अरविंदसह दोन हवालदारांना घटनास्थळी पाठवले, असा आरोप होत आहे. शैलेंद्रच्या म्हणण्यानुसार, अरविंद आणि त्याचा मित्र राजीव नगर येथील वसीम गॅरेजसमोर पोहोचताच अचानक अल्लू, आरिफ, सद्दाम, जुम्मन, शेर अली यांनी दोघांवर धारदार शस्त्रांनी वार केले. यावेळी पोलीस कर्मचारीही प्रेक्षक म्हणून उभे राहिले. मात्र, कॉन्स्टेबलने धाव घेत अल्लूला पकडले, तर उर्वरित आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. नंतर आरिफलाही पकडण्यात आले. गंभीर जखमी अरविंदला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला.