ढाका : शेख हसीना यांनी राजीनामा देऊन (Bangladesh Violence) बांगलादेशातून पळ काढल्यानंतर देशात हिंदूंवर अत्याचार सुरू झाले आहेत. बांगलादेशात विविध ठिकाणी हिंदू मंदिरे आणि हिंदू समुदायावर हल्ले झाल्याच्या बातम्या येत आहेत. बांगलादेशातून आलेल्या अहवालात हिंदू घरे आणि मंदिरांना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसून येते. इस्कॉन आणि काली मंदिरावर हल्ले झाले आहेत, त्यानंतर हिंदूंना जीव वाचवण्यासाठी लपून बसावे लागले आहे. ज्या इस्कॉन मंदिराने बांगलादेश निर्मितीच्या वेळी 6 महीने लाखों लोकांना अन्नदान केले आज त्याच मंदिराला जाळण्यात आले आहे.
Bangladesh Violence : बांगलादेशात निष्पाप हिंदूंचा बळी; आतापर्यंत 100 हिंदूंची हत्या
न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रंगपूर येथील हिंदू कौन्सिलर काजल रॉय यांची मुस्लिमांनी हत्या देखील केली. दरम्यान, हिंदू अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी बांगलादेश लष्कर पुढे आले आहे. हिंदू कुटुंबे, मंदिरे आणि इतर प्रार्थनास्थळांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी लष्कराने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
200 वर्ष जुने असलेले माता कालीचे मंदिर देखील जाळण्यात (Bangladesh Violence) आले आहे. इस्कॉन इंडियाचे प्रवक्ते युधिष्ठिर गोविंद दास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की, संस्थेच्या मंदिरावर हल्ला करण्यात आला आणि मूर्तींची मोडतोड करण्यात आली. मला मिळालेल्या माहितीनुसार, मेहेरपूर (खुलना विभाग) येथील आमच्या एका केंद्रात भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा देवी यांच्या मूर्ती जाळण्यात आल्या. केंद्रात थांबलेल्या तीन भाविकांना कसा तरी जीव वाचवण्यात यश मिळाले.
बांगलादेशात गेले अनेक वर्ष हिंदू अल्पसंख्यांक यांच्यावर हल्ले होत आहेत. आज बांगलादेशात निर्माण झालेल्या अराजकतेचा फायदा घेऊन अनेक दहशतवादी कृत्य करणाऱ्याना हिंदूना लक्ष करण्याची आयती संधी मिळाली.