Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला (Bangladesh Violence) आहे. प्रोफेसर मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकारचा गुरुवारी संध्याकाळी शपथविधी संपन्न होणार आहे. युनूस यांनी भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधांचा उल्लेख केला आहे. भारताशी घनिष्ठ मैत्री पुन्हा सुरू करण्याच्या अनेक संधी लवकरच येतील, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, भारताने शेख हसीना यांना पाठिंबा दिल्याने बांगलादेशातील जनता नाराज असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधात दुरावा निर्माण झाला आहे.
युनूस म्हणाले की अंतरिम सरकारची पुढील पायरी म्हणजे सर्व राजकीय कैद्यांची सुटका करणे आणि काही महिन्यांत मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होतील याची खात्री करणे. “मी या प्रक्रियेला मदत करण्यास तयार आहे आणि मला आशा आहे की इतरही माझ्यासोबत सामील होतील,” ते म्हणाले, बांगलादेशातील (Bangladesh Violence) जनतेच्या भावनांनुसार काम केले जाईल आणि नवीन सरकार अधिक चांगले काम करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आपल्याला पुढे जाण्यासाठी नवीन राजकारणी आणि नवीन नेत्यांची नितांत गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या तरुणांची गरज आहे.