नवी दिल्ली : आज दिल्ली येथे खासदार श्रीकांत शिंदे यांनी (Delhi) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वक्फ विधेयक विषयासह राज्यातील अनेक महत्वाच्या विषयावर भूमिका स्पष्ट केली. यामध्ये त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांना भेटण्यासाठी दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे. मात्र आज उद्धव ठाकरे आणि उबाठा गट स्वतःच्या स्वार्थासाठी तीन दिवस दिल्लीत येऊन थांबले. मला मुख्यमंत्री करा असे काँग्रेसजवळ गाऱ्हाणे घालण्यासाठी ते दिल्लीत थांबले. आजवर महाराष्ट्राने एवढी लाचार परिस्थिती पहिली नाही. उबाठाने बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारधारा सोडून दिली आहे, असे वक्तव्य केले. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे गटाबद्दल आणखी काही गोष्टींचा गौप्यस्फोट केला आहे.
त्यांनी सांगितले, की ”आमची इच्छा नसताना देखील उबाठा गट आम्हाला भेटण्यासाठी वेळ मागत आहे”, असे काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांना सांगितले. 2019 मध्ये उबाठा बाळासाहेबांचा आणि पंतप्रधान मोदी साहेबांचा फोटो लावून निवडून आले, मात्र नंतर सत्तेसाठी युती केली काँग्रेस सोबत, तेव्हा युती करून हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला.
मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्वाचे विधेयक असलेले वक्फ विधेयक लोकसभेत मांडले जात असताना उबाठा गटाचे सर्व 9 खासदार पळून गेले. कारण त्यांच्या विचारधारेतच गोंधळ आहे. कोणाला पाठिंबा द्यायचा आणि कोणाला नाही, याचाच संभ्रम आहे.
२०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने मोठ्या विश्वासाने उबाठा गटाला मतदान केले. मात्र त्याच समाजासाठी महत्वाचे असलेले वक्फ विधेयक लोकसभेत मांडले जात असताना उबाठा गटाने त्याबाबत भूमिका न मांडता पळ काढला. मुस्लिम समाजाला वाऱ्यावर सोडण्याचे काम केले आणि त्यांच्या पाठीत खंजीर त्यांनी खुपसला आहे. मुस्लिम समाजाने या सर्व गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. वक्फ विधेयकावर उबाठाच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.
वक्फ विधेयकामधील सुधारणेनंतर मुस्लिम समाजातील महिलांना देखील (Delhi) प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. वक्फ बोर्डाच्या जागेवर अनेक शाळा, महाविद्यालये अशी कामे होतील. याचा फायदा सर्व मुस्लिम समाजाला होईल. काही मोजक्याच लोकांच्या हातात वक्फ बोर्ड राहणार नाही.
Neeraj Chopra : पुन्हा एकदा नीरज चोप्राची झेप; भारताला मिळवून दिले रौप्य पदक!
उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींकडे हट्ट केला की मला मुख्यमंत्री करा. मात्र राहुल गांधींनी उद्धव ठाकरे यांना स्पष्ट केले की असल्या गोष्टी होणार नाहीत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर टीका करण्याचं काम विरोधकांनी केले. मात्र दुसरीकडे त्याच योजनेचे अर्ज स्वतःच्या पक्ष कार्यालयातून महिलांना भरून देत होते. यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या कार्यकाळात काय केले हे अगोदर स्पष्ट करावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात कायम स्वरूपी राबविली जाईल. माता – भगिनींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.
महाविकास आघाडीमध्ये सध्या काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे उबाठा गटाला विधानसभेच्या जागावाटपावेळी त्यांचे ऐकावे (Delhi) लागणार आहे, त्यांची परिस्थिती तशीच झाली असल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले. उबाठा गटाचे महाविकास आघाडीमध्ये राज्यातील कोणत्याच नेत्यांसोबत पटत नाही. त्यामुळे सर्व सर्व बड्या नेत्यांना बाजूला करून उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री करा म्हणून दिल्ली गाठली आणि तीन दिवस ताटकळत थांबले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार राज्याचा सर्व समावेशक विकास करत आहे, असे देखील श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.