अमरावती : आमचं सरकार आलं (Ravi Rana Dispute) की लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांचे आम्ही 3 हजार रुपये करू; आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा मात्र आशीर्वाद दिला नाही तर 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेऊ असं अमरावती येथे आमदार रवी राणा यांनी वक्तव्य केले. हे वक्तव्य त्यांना महागात पडले असून महायुती सरकारच्या मोठ्या नेत्यांनी मात्र त्यांचा योग्य तो समाचार घेतला असून विरोधी पक्षाने देखील या वक्तव्यावर टीका केली आहे.
या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले , की आमचे काही मित्र गंमती गंमतीत बोलताना काहीही बोलताना, कुणीतरी म्हणतं पैसे परत घेऊ, पण वेड्यांनो या देशात भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली, की त्याच्या बदल्यात केवळ प्रेम मिळते. त्यामुळे कुणी मत दिलं किंवा नाही दिलं, तरी ही योजना बंद केली जाणार नाही. कुणाचा बाप ही योजना बंद करू शकत नाही”
तर विरोधी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील टीका करताना म्हंटले की तुम्ही विचार करा माहेर जेव्हा सोडून सासरी जातो, तेव्हा घरी आमच्या बहिणीला नीट बघा, असं म्हणणारा भाऊ असतो. तोच भाऊ बहिणीला जर धमकी देणार असेल तर बघा मत नाही दिलं ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे. मग आम्ही बहिणी परवडल्या. काय नको भावांनी प्रेम दिलं यावरच आम्ही खूश असतो. नको बाबा तुझे 1500 रुपये, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
Waqf Board : जेव्हा 1500 वर्ष जुन्या मंदिराच्या शिलालेखाने वक्फ बोर्डाला पाडले खोटे..
1500 रुपये परत घेणाऱ्या भावाला आदरपूर्वक प्रेमानं सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या लेकीला धमकी दिली ना 1500 रुपये परत घेईन तर तू घेऊनच दाखव, बघते तुझा काय कार्यक्रम करते, ये नही चलेगा अशा कडक शब्दात सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांना इशारा दिला
तर आता मंत्री अदिती तटकरे यांनी देखील रवी राणा यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना म्हंटले की रवी राणांनी केलेलं विधान दुर्दैवी आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचं विधान करणं चुकीचं आहे. महायुतीच्या सरकारनं ही जी योजना आणली आहे, ती गरीब महिलांच्या सन्मानासाठी आहे. त्या महिलांकडून पैसे परत घेण्याचा असा कोणताही विचार सरकार करत नाही. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, हा आमचा उद्देश आहे, त्यामुळे अशा प्रकारची विधानं करून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असं मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.