मुंबई : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना (Ajit Pawar) वेग आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी कबुली दिली आहे. पत्नी सुनेत्रा पवार यांनी बहिण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवायला नको होती, अशी कबुली अजित पवार यांनी दिली. संसदीय मंडळाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. एकदा बाण सोडला की तो परत घेता येत नाही, असे ते म्हणाले. पण असं व्हायला नको होतं असं माझं मन आज मला सांगत आहे.
Ravi Rana Dispute : देवेंद्र फडणविसांपासून सुप्रिया सुळे यांनी रवी राणांचा घेतला चांगलाच समाचार
बारामतीत तुमची कोणी लाडकी बहीण आहे का? असा एक खोचक सवाल अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, राजकारणात राजकारणाला स्थान असते, मात्र या सर्व माझ्या लाडक्या बहिणी आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण सुरू आहे पण घरात राजकारण येऊ देऊ नये. मात्र, लोकसभेच्या वेळी माझ्याकडून (Ajit Pawar) चूक झाली. माझ्या बहिणीच्या विरोधात मी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत उतरवायला नको होते. अजित पवार म्हणाले की, सुनेत्रा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय संसदीय मंडळाने घेतला होता, तो मागे घेता येणारा नव्हता.