Hindakesari News : लोकसभा निवडणूक २०२४ च्या अपयशाने खचून न जाता (MaharashtraElection2024) उंच भरारी घेत भाजपचे किंगमेकर, गेमचेंजर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विजयाचा पताका फडकवला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या ४१ नेत्यांसमवेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यापैकी ४० नेत्यानी आपापले गड राखून रेकॉर्ड ब्रेक विजय संपादन करून महाविकास आघाडीला सर्व बाजून चितपट केले आहे. तर अजित पवार यांनी देखील आपल्या जागांमध्ये कसूर सोडलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या सहा महिन्याआधी पराभावाची घेतलेली जबाबदारी विजयाने पूर्ण केली आहे. यामुळे केंद्रात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कौतुक केले आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे विधानसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीला महायुतीचे वादळ तग धरता आले नाही आणि 288 पैकी केवळ 55 जागा मिळवता आल्या. महायुतीला 223 जागा मिळाल्या आहेत. युतीच्या या मोठ्या (MaharashtraElection2024) विजयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या तोंडावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे निकालावर खूश दिसत नाहीत. यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले, ‘…एकजूट होऊन आम्ही आणखी उंच उडू! एनडीएला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल आपल्या महाराष्ट्रातील बंधू-भगिनींचे, विशेषत: तरुण आणि महिलांचे मनःपूर्वक आभार… मी जनतेला खात्री देतो की आमची आघाडी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहील…”
Gautam Adani : गौतम अदानी यांच्यावर कोट्यावधीच्या फसवणुकीचा आरोप; विरोधी पक्षाकडून अटकेची मागणी