Hindakesari News : महाराष्ट्रात महायुतीचा दणदणीत (Maharashtra Next CM) विजय झाल्यावर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? याची उत्सुकता दाटून आली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी समर्थक आपाआपल्या नेत्यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी लावत आहेत. त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत बैठक पूर्ण झाली असून भाजपकडेच राज्याचे मुख्यमंत्रीपद राहील हे निश्चित झाल्याचे समजत आहे. मात्र यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र नाराज असल्याचे समोर येत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजयानंतर आता महायुतीमध्ये सत्तेतील वाट्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. 132 जागा जिंकणारा भाजप मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर असून पुढे सरसावत आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेबाबत संभ्रम कायम आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबईत येणार आहेत. ते निरीक्षक म्हणून मुंबईत येत आहेत. अमित शहा स्वतः मुख्यमंत्रीपदाची घोषणा करणार आहेत. मंत्रिपदाच्या वाटपाच्या मुद्द्यावरही शहा फॉर्म्युला देणार आहेत.
शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीएम पदासाठी इच्छुक असून त्यांचे आमदारही सातत्याने एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, असा दावा करत आहेत. मात्र, राजधानी दिल्लीत आज महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. भाजपकडेच (Maharashtra Next CM) राज्याचे मुख्यमंत्रीपद राहील हे निश्चित झाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समजते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून हा निरोप कळवण्यात आला आहे. त्यानतंर, एकनाथ शिंदे नाराज झाले असून सायंकाळनंतर सर्व भेटीगाठी त्यांनी रद्द केल्याची माहिती आहे. तर, एकनाथ शिंदे काही मोठा निर्णय घेणार का? की महायुतीसोबतच राहणार की वेगळा विचार करतील? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा मुंबईत येऊन करणार मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा करतील, असेही समजते.
Central Government : युवकांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकारची पॅन 2.0 आणि ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ला मान्यता