Hindakesari News : महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्यांबाबत सस्पेन्स अजूनही (Maharashtra Next CM) आहे. अद्याप एकाही नेत्याच्या नावाला मंजुरी मिळालेली नाही. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून मुख्यमंत्री पद देण्याची चर्चा सुरू आहे. तर लोकांच्या मनात शिंदे मुख्यमंत्री असण्याचा दावा केला जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद दिले जाणार असून एकनाथ शिंदे यांना केंद्रात येण्याची ऑफर असल्याचे म्हंटले जात आहे. तर दुसरीकडे जनतेमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा पाहायला आवडेल असे सांगितले जात आहे. यामध्येच अजून एक चर्चेला उधाण आले (Maharashtra Next CM) आहे. ते म्हणजे जर फडणवीस यांना मुख्यमंत्री पद दिले तर एकनाथ शिंदे हे बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे समजते. परंतु, असे कोणतेही विधान किंवा स्पष्टता एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेली नाही. त्यामुळे हे विधान केवळ चर्चा असल्याचे मानले जात आहे.
Maharashtra Breaking : एकनाथ शिंदे यांनी दिला राजीनामा! नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव अजूनही गुलदस्त्यात!