Hindakesari News : मातृत्वाला काळिमा (Mumbai) फासणारी घटना मुंबई येथून समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई, गुजरात आणि कर्नाटकमध्ये पसरलेल्या आंतरराज्यीय बाल तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आठ महिलांसह नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पतीसाठी महिलेने मातृत्व विसरून स्वतःचे मूल पाच लाख रुपयांना विकले. तुरुंगात असलेल्या पतीला जामीन मिळवण्यासाठी पैसे नसल्यामुळे तिने आपली मुलगी विकल्याचे महिलेने सांगितले. यात कर्नाटकातील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि परिचारिका यांचा सहभाग असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे.
कर्नाटकातील कारवारमध्ये एका दाम्पत्याला पाच लाख रुपयांना विकलेल्या चार महिन्यांच्या चिमुरडीची सुटका करण्यात आली आहे.
या प्रकरणी सुलोचना सुरेश कांबळे (45), मीरा राजाराम यादव (40), योगेश भोईर (37), रोशनी घोष (34), संध्या राजपूत (48), मदिना उर्फ मुन्नी इमाम चव्हाण (44), तैनाज शाहीन चौहान (19), बेबी मोईनुद्दीन तांबोळी (50) आणि मनीषा सनी यादव (32) यांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी शहरातील दादर आणि शिवडी, दिवा, वडोदरा आणि कारवार येथील रहिवासी असून ते लग्नाचे नियोजन आणि रुग्णालयात सहाय्यक म्हणून काम करतात.
या प्रकरणी चिमूरडीच्या आजीने (सायन-माहीम लिंक रोड) 11 डिसेंबर रोजी तिची सून मनीषा यादवने तिचे चार महिन्यांचे बाळ विकल्याची तक्रार दाखल केली होती.वडोदरा येथील मदिना चव्हाण आणि तैनाज चौहान यांच्या मदतीने कर्नाटकातील एका जोडप्याला एक लाख रुपयांना मूल विकल्याची कबुली मनीषाने दिली.
Ghatkopar : मोहम्मद युनूसचे नोबल काढून घ्या; बांगलादेशविरोधात घाटकोपरमध्ये एल्गार!
सविस्तर माहिती अशी, की महिलेच्या पतीला रेल्वे पोलिसांनी चोरीच्या एका (Mumbai) प्रकरणात अटक केली होती. तो भायखळा कारागृहात बंद आहे. नुकतीच ही महिला पतीला भेटण्यासाठी तुरुंगात गेली असता, पतीने तिला जामिनासाठी पैशांची व्यवस्था करण्यास सांगितले. महिलेने प्रयत्न केले पण कोणतीही व्यवस्था झाली नाही. अखेर काही दिवसांतच तिची प्रसूती झाल्यावर तिने आपली मुलगी विकण्याचा निर्णय घेतला. मुलीची 5 लाख रुपयांना विक्री झाली होती, मात्र तिच्या आईला केवळ 1 लाख रुपये देण्यात आले होते.
डीसीपी रागसुधा आर यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने अनेक राज्यांमध्ये समन्वय साधला. त्यानंतर आरोपींना ठाणे, वडोदरा आणि कारवार येथून अटक करण्यात आली. यावेळी आरोपींनी अल्प उत्पन्न असलेल्या इतरही कुटुंबांना लक्ष्य केल्याचे समोर आले. आरोपींनी या आधी किमान सहा मुलांची तस्करी केल्याचा संशय पोलिसांना आहे.