हिंदकेसरी न्यूज : महायुतीचे नेते धनंजय मुंडे यांच्या (Jaykumar Gore) नंतर आता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. जयकुमार गोरे यांनी हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यांने विनयभंग आणि छळ केल्याचा आरोप ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विकृत असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
संजय राऊत यांनी म्हंटले, की जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वत:चे नग्न फोटो पाठवले. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यांने कसा विनयभंग आणि छळ केल्याचं कळतंय. ही महिला काही दिवसांनी विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे. देवेंद्र फडणविसांनी पुन्हा एकदा पत्ते पिसले पाहिजे ही सगळी रत्न फडणविसांनी एकदा तपासली पाहिजे.
जयकुमार गोरेंबद्दलचे आरोप महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील स्त्रीचा विनयभंग गेला अशा मंत्र्याला आपण मंत्रीमंडळात का ठेवलं आहे? असा सवालही संजय राऊत यांनी केला.
Santosh Deshmukh Murder : मोठी बातमी! धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा! देवगिरी बंगल्यावर तातडीची बैठक
तसेच महिलांच्या सबलीकरणाबद्दल देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने नैतिकतेवर बोलतायत..हे सगळे प्रश्न आम्ही केंद्राकडे पाठवणार, अमित शाह यांना पत्र लिहणार, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
आमदार जयकुमार गोरे यांच्यावर 2016 मध्ये काँग्रेसमधे असताना एका महिलेला आक्षेपार्ह फोटो पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने अटकूपर्व जामीन अर्ज (Jaykumar Gore) फेटाळला होता आणि त्यानंतर गोरे यांना अटक होऊन दहा दिवसांची जेलमधे रवानगीही झाली होती.
नेमकं प्रकरण काय?- जानेवारी 2025 पासून अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर पीडितेने 2016 मध्ये दाखल केलेली तक्रार व्हायरल करण्यात आली. त्यामुळे पीडितेचे नाव उघड झाले. तिची बदनामी केली गेली. 9 जानेवारी 2025 रोजी पीडित महिलेच्या घरी पत्र आले. त्यात 2016ची तक्रार होती. हे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी सुरू आहे, असे पीडित महिलेने राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.