हिंदकेसरी न्यूज : यंदा हिंदू सण होळी ही दिनांक 14 मार्च रोजी आहे. (UP) तर रमजानचा दूसरा जुमा 14 मार्च रोजी आल्याने उत्तर प्रदेश येथील संभल जिल्ह्यात नियोजन पूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संभलचे सर्कल ऑफिसर (सीओ) अनुज चौधरी यांनी केलेल्या विधानाने विरोधक पेटून उठले आहेत. ज्यांना रंगांचा त्रास होतो त्यांनी घराबाहेर पडू नका असे त्यांनी म्हंटले आहे. यामुळे काही ठिकाणी त्यांचे कौतुक देखील केले जात आहे.
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना संभलचे सर्कल ऑफिसर (सीओ) अनुज चौधरी म्हणाले, ‘होळी हा सण वर्षातून एकदा येतो, तर शुक्रवारची नमाज वर्षातून ५२ वेळा होते. जर कोणाला होळीच्या रंगांची अडचण असेल तर त्याने त्या दिवशी घरातच राहावे. सण एकत्र साजरे करायचे असल्याने बाहेर जाणाऱ्यांनी मोकळेपणाने वागले पाहिजे.
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अमिक जम्मी यांनी सीओ अनुज चौधरी यांच्या वक्तव्यावर म्हंटले की सीओ अनुज चौधरी यांनी भाजपला खूश करण्यासाठी मुस्लिमांविरोधात वक्तव्य केले आहे. त्यांच्यापेक्षा मोठा गुंड कधीच झाला नाही. खुनाच्या प्रकरणात भाजपने मदत केली त्यामुळे (UP) त्याला आनंद होत आहे. आपल्या मोठ्यांच्या उपकारामुळेच ही कारकीर्द घडली. परदेशात गेले, नोकरी मिळाली, समाजवाद्यांकडून नाट्य शिकले. ज्या दिवशी सरकार बदलेल त्यादिवशी वरील देव प्रत्येक बाबतीत न्याय देईल.
महेश लांडगे यांचा आक्रमक पवित्रा! 💪🔥*
अबू आझमींना ठाम प्रत्युत्तर! 🚨💯