• About Us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
hindakesari.com
Advertisement
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
    • शहर
    • कोकण
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
    • अध्यात्म
    • शिक्षण
    • विज्ञान
    • आरोग्य
    • क्रीडा
    • खाऊगल्ली
No Result
View All Result
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
    • शहर
    • कोकण
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
    • अध्यात्म
    • शिक्षण
    • विज्ञान
    • आरोग्य
    • क्रीडा
    • खाऊगल्ली
No Result
View All Result
hindakesari.com
No Result
View All Result
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
Home अर्थकारण

Maharashtra Budget 2025 : जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

Admin by Admin
March 10, 2025
in अर्थकारण, महाराष्ट्र
0
Maharashtra Budget 2025 :  जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हिंदकेसरी न्यूज : राज्यात गुंतवणुकीला पोषक वातावरण (Maharashtra Budget 2025) असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पपूर्तीला बळ देणारा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प आहे. औद्योगिक विकासात  राज्य सदैव अग्रेसर असून थेट विदेशी गुंतवणूकीच्या बाबतीतही देशात अव्वल आहे. जानेवारी, 2025 मध्ये  दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाव्दारे एकूण 63 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. त्‍याव्दारे येत्या काळात 15 लाख 72 हजार 654 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे 16 लाख रोजगार निर्मिती होईल, असा अंदाज आहे.

वस्तू व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राज्यकर विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विविध कायद्यांनुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे असलेली थकबाकीची तडजोड करण्याबाबतची अभय योजना उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केली.  अभय योजनेचे नाव “महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क (सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यानी प्रदेय असलेल्या) यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत अधिनियम, 2025” असे असून या अभय योजनेचा कालावधी प्रस्तावित कायदा लागू झाल्याच्या दिनांकापासून दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

Dhule : शिरपूर धारकरी मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षकाचे निलंबन

ठळक वैशिष्ट्ये : (Maharashtra Budget 2025)

  1. राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3 टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यातही शासन यशस्वी ठरले आहे. तसेच राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या 1 टक्क्यापेक्षा कमी राहिली आहे. सन 2025-26 ची राजकोषीय तूट 1 लाख 36 हजार ‍235 कोटी रुपये आहे.
  2. आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून, भांडवली खर्चातील वाढीद्वारे विकासचक्रास चालना देऊन राज्याच्या विकासदरात वाढ करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्याचे प्रयत्न आहेत. मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था १४० बिलीयन डॉलर वरुन सन २०३० पर्यंत ३०० बिलीयन डॉलर तर सन २०४७ पर्यंत १.५ ट्रिलीयन डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दीष्ट आहे. मुंबई महानगर प्रदेशात हाती घेण्यात आलेल्या विविध पायाभूत सुविधांची कामे जसे की वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुलेट ट्रेन, मल्टीमोडल कॉरीडॉर, भुयारी मार्ग, मेट्रो प्रकल्प यामुळे हे क्षेत्र विकासाचे केंद्र ठरणार आहे.
  3. विकसित भारत- विकसित महाराष्ट्र ही संकल्पना साध्य करण्याकरीता “मेक इन महाराष्ट्र” व्दारे गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्राचे नवीन औद्योगीक धोरण आखण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षाच्या कालावधीत ४० लाख कोटी रुप यांची गुंतवणुक व ५० लाख रोजगार निर्मिती अपेक्षीत आहे.
  4. कृषी क्षेत्राच्या गेल्या वर्षीच्या निराशाजनक 3.3% विकास दराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना विविध योजना, कार्यक्रमांच्या माध्यमातुन आर्थिक सहाय्य दिल्यामुळे सन 2024-25 मध्ये कृषी क्षेत्राचा विकास दर 8.7% पर्यंत सुधारला. या विकास दरात सातत्याने वाढ करण्याकरीता शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शेती उत्पादनात मूल्यवर्धन, सिचंन सुविधा, वीजेची गरज भागविण्यासाठी सौर ऊर्जा इत्यादी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येतील.
  5. केंद्र पुरस्कृत योजनांच्या माध्यमातून राज्यास अधिकाअधिक केंद्रीय निधी प्राप्त व्हावा म्हणून विशेष प्रयत्न करण्यात येतील.
  6. वस्तु व सेवा करातुन राज्यास होणाऱ्या उत्पन्नात दरवर्षी सुमारे १२ ते १४ टक्के एवढी वाढ होत आहे.
  7. महत्वाकांक्षी योजनांना निधीचा सुरळीत पुरवठा होण्याकरीता केंद्रीय सहाय्य, आतंरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून सहाय्य , सार्वजनिक मालमत्तेचे मुद्रीकरण, योजनांचे सुसूत्रीकरण तसेच पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यास सारखे नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.
  8. राज्यातील महामार्ग, बंदरे, विमानतळे, जलमार्ग, बस वाहतूक, रेल्वे आणि मेट्रो या सर्व दळणवळण क्षेत्रांसाठी पुरेशी अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली आहे.
  9. दर्जेदार ग्रामीण रस्ते तसेच राज्य महामार्ग व जिल्हा रस्त्यांना सर्वाधिक आर्थिक पाठबळ देण्यात येत आहे.
  10. सर्वांसाठी घरे हे उद्दीष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ग्रामीण घरकुलांसाठी 15 हजार कोटी तर शहरी आवास योजनांसाठी 8 हजार 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  11. नव्याने जाहीर केलेल्या योजनांसाठी पुरेशा तरतुदी केलेल्या आहेत. राज्याच्या वार्षिक योजनेत 62 हजार 560 कोटीची म्हणजेच सुमारे ३३ टक्के इतकी भरीव वाढ करण्यात आली असून अनुसूचीत जाती घटक योजनेच्या तरतुदीत 42 टक्के, आदिवासी घटक योजनेच्या तरतुदीत 40 टक्के वाढ करण्यात आली आहे.
  12. राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या योजनांचे मुल्यमापन करुन त्यांचे सुसूत्रीकरण तसेच साधनसंपत्तीच्या स्त्रोतांचा अभ्यास करुन त्यामध्ये वाढ करण्याचे उपाय सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या शिफारशी विचारात घेऊन योजनांची अधिक (Maharashtra Budget 2025) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
  13. थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी) सर्व वैयक्तिक लाभार्थी योजनांची अंमलबजावणी गतिमान, कार्यक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी डीबीटी पध्दत राबविण्यात येत आहे. दिनांक १ एप्रिल २०२५ पासून अशा वैयक्तिक लाभार्थी योजनांचा लाभ केवळ डीबीटी द्वारे देण्यात येईल.
  14. राज्याच्या सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पाठबळ देण्यात येत आहे अर्थसंकल्पात विविध स्मारके, तीर्थक्षेत्र विकास, पर्यटनस्थळ विकसित करण्याच्या विविध प्रकल्पांना भरीव तरतुद करण्यात आली आहे.
  15. राज्यातील जलपर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत.
  16. क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आणि खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी धोरणे आणि अर्थसंकल्पीय तरतुदी करण्यात आल्या आहेत.
  17. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीत स्मार्ट पीडीएस आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञानाद्वारे अधिक पारदर्शकता आणण्यात येणार आहे.
  18. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रातील महाराष्ट्राचे नेतृत्व अधोरेखित करण्यासाठी विविध महोत्सव व कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
  19. राज्याचे सार्वजनिक आरोग्य धोरण आखण्यात येवून प्रत्येक व्यक्तीला 5 किलोमीटरच्या परिघात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
  20. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अमंलबजावणी करण्यात येणार असून मुलींचा व्यावसायीक शिक्षणात सहभाग वाढविण्या करीता शिक्षण व परिक्षा शुल्काची 100 टक्के प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे.
  21. कायदेशीर खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्यातील न्यायालयांच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.

Tags: Abhay YojanaBudget 2025DavosDeputy Chief Minister Ajit PawarGoods and Services Tax ActInterestMaharashtra Budget 2025Maharashtra TaxPenalty or Late FeePrime Minister Narendra ModiWorld Economic Forum
Previous Post

Dhule : शिरपूर धारकरी मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षकाचे निलंबन

Next Post

Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

Next Post
Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी - डॉ. विनय सहस्रबुद्धे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Uran

Uran : माणुसकिला काळिमा फासणारी घटना; तरुणीच्या शरीराचे केले तुकडे; लव्ह जिहादातून षडयंत्र

July 27, 2024
Kolkata Rape Case

Kolkata : कोलकाता बलात्कार प्रकरणातील पोस्टमॉर्टम अहवालात 5 वेदनादायी खुलासे; चष्म्याचे तुकडे देखील डोळ्यात घुसले!

August 17, 2024
Dharavi : भररस्त्यात पोलिसांसमोरच हिंदू तरुणाची हात कापून निर्घृण हत्या

Dharavi : भररस्त्यात पोलिसांसमोरच हिंदू तरुणाची हात कापून निर्घृण हत्या

July 30, 2024
Badlapur Rumor: चिमुकल्यांची तब्येत आईसह व्यवस्थित; समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

Badlapur Rumor: चिमुकल्यांची तब्येत आईसह व्यवस्थित; समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

August 22, 2024
97 टक्के गुण असूनही एडमिशन मिळेना ; विद्यार्थिनीच्या ट्विटवर आरक्षणाचा मुद्दा वादात!

97 टक्के गुण असूनही एडमिशन मिळेना ; विद्यार्थिनीच्या ट्विटवर आरक्षणाचा मुद्दा वादात!

0
खोट्या माहितीचा आयआरसीटीसीला फटका; नियमात कोणतेही बदल नाहीत

खोट्या माहितीचा आयआरसीटीसीला फटका; नियमात कोणतेही बदल नाहीत

0
श्रीराम मंदिर हा राष्ट्रीय पुनरुत्थानाचा क्षण आहे…

श्रीराम मंदिर हा राष्ट्रीय पुनरुत्थानाचा क्षण आहे…

0
ऑलिम्पिकच्या तक्त्यावर पहिला कुस्तीपटू – खाशाबा जाधव

ऑलिम्पिकच्या तक्त्यावर पहिला कुस्तीपटू – खाशाबा जाधव

0
Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

May 2, 2025
Maharashtra Budget 2025 :  जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

Maharashtra Budget 2025 : जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

March 10, 2025
Dhule : शिरपूर धारकरी मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षकाचे निलंबन

Dhule : शिरपूर धारकरी मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षकाचे निलंबन

March 9, 2025
Dhule shivpratishthan hindusthan

Dhule : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्याला विनाकारण मारहाण करणे पडले महागात; पोलिस उपनिरीक्षकाची तात्काळ बदली

March 8, 2025

Recent News

सध्याच्या आधुनिक युगात बातम्या, घडामोडी, माहिती सर्व ऑनलाइन झाले आहे.
कोणतीही माहिती सहजच एका क्लिकवर वेबसाईटवर उपलब्ध होते.
सोशल मीडिया हा अनेक वेबसाईटने वृद्धिंगत होत चालला आहे. त्यामध्येच आमची ‘हिंदकेसरी’ ही वृत्तसंस्था येते.

Follow Us

Browse by Category

  • Apps
  • Entertainment
  • Recent News
  • Sports
  • Tech
  • Uncategorized
  • अध्यात्म
  • अर्थकारण
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • इतर
  • ऐतिहासिक
  • कोकण
  • क्रीडा
  • क्रीडा
  • गुन्हेगारी
  • चंदेरी दुनिया
  • देश – विदेश
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • वेगवान बातम्या
  • शहर
  • शिक्षण
  • शेती
  • सत्ताकारण

Recent News

Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

May 2, 2025
Maharashtra Budget 2025 :  जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

Maharashtra Budget 2025 : जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

March 10, 2025
  • About Us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6

© 2024 Hinda Kesari - Meta Bay Meta Bay | 9029508907.

No Result
View All Result
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
    • शहर
    • कोकण
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
    • अध्यात्म
    • शिक्षण
    • विज्ञान
    • आरोग्य
    • क्रीडा
    • खाऊगल्ली

© 2024 Hinda Kesari - Meta Bay Meta Bay | 9029508907.

error: Content is protected !!