पुणे : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Ajit Pawar) यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यावर आता अजित पवार गटाचे नेते अतुल बेनके यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली. यावरून आता नव्या चर्चाना उधाण आले आहे. अतुल बेनके हे अजित पवार यांची साथ सोडून पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार असल्याचे म्हंटले जात आहे. तर या भेटीवर शरद पवार, अजित पवार आणि अतुल बेनके यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
शिरूर येथे खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी अतुल बेनके आणि शरद पवार यांची भेट घडून आली. यामध्ये त्यांच्यात अनेक चर्चाही झाल्या. या विषयावर समाजमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले; बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांच्याबद्दल त्यानाच विचारा. माझीही अनेक आमदार भेट घेतात. निवडणुका आल्यावर अनेकांना जागा लढवयाची असते; पण ती जागा सुटणार नसेल तर दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार अनेकांना येतो; त्यामुळे (Ajit Pawar) अशा भेटी होतात.
Sharad Pawar : शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा दिलासा; चिन्हांचा संभ्रम केला दूर
तर, शरद पवार म्हणाले यात नवीन काय आहे? अतुल बेनके यांचे वडील माझे मित्र आहेत. त्यामुळे आमचे चांगले संबंध आहेत. त्यातून भेट होत असते. शिवाय निवडणुकीत पक्षासाठी काम करणाऱ्यांना आम्ही नेहमीच पाठिंबा देतो. यामध्ये काही राजकारण होत असेल तर त्यावेळेला त्याचा निकाल देऊ
यावर अतुल बेनके म्हणाले, की राजकारणात काहीही घडू शकते. अगदी शरद पवार आणि अजित पवारही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे पुढे काहीही घडू शकते.