बदलापूर : बदलापुर येथील चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक (Badlapur) अत्याचार प्रकरणी बदलापूर नागरिक पेटून उठले आहेत. अशातच धक्कादायक बातमी समोर येत आहे. फील्डवर कार्यरत असलेल्या महिला पत्रकाराला नगराध्यक्ष वामन म्हात्रे याने जणू काही तुझ्यावर रेप झाला आहे असे घाणेरडे उद्गार काढले.
एकीकडे बलात्कार, लैंगिक अत्याचारासाठी रस्त्यावर उतरलेले नागरिक आणि दुसरीकडे त्यांच्या बातम्या पोहचवणाऱ्या महिला पत्रकाराला प्रशासनाकडून अशी वागणूक मिळते ही धक्कादायक बातमी आहे.
सविस्तर माहिती अशी, की नामांकित वर्तमान पत्राच्या महिला पत्रकार रिपोर्टिंग (Badlapur) करण्यासाठी बदलापूर आंदोलनाच्या दिशा जाण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी समोरून नगराध्यक्ष वामन म्हात्रे येत होते. त्यांनी महिला पत्रकाराला अडवले आणि तुमच्यामुळेच आंदोलनासारखे प्रकार घडतात. असा आरोप केला. विनयभंगाला असे रूप दिले, जणू काही तुझ्यावरच रेप झाल्याचे त्यांनी म्हंटले. यामुळे आता सर्व पत्रकारांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.