बदलापूर : बदलापूर येथे शाळेतील शिपायाने दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार (Badlapur Breaking) केल्याची घटना घडली. यामुळे बदलापुर येथील नागरिकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात उठाव केला. शाळेतच नव्हे तर रस्ता रोको, रेल्वे रोको सारखी आंदोलन केले. यामुले प्रशासनने अॅक्शन मोडवर येऊन तात्काळ दखल घेतली. शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. यासोबतच पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. तसेच संस्थाचालकांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले.
संतप्त जमावाने बदलापूर येथे रेल रोको आंदोलन छेडले आहे. तुरळक दगडफेकही झाली आहे. लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीला कडक शासन करण्यात येईल, असे जाहीर करुन जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देश दिले आहेत.
सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देश दिले आहे. या झालेल्या मन:स्तापाबद्दल संस्थेने माफी मागितली आहे. कायदा व सुव्यवस्था कोणीही हातात घेवू नये, जिल्हा प्रशासनाकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेतली असून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे स्वतः संपूर्ण (Badlapur Breaking) घटनेबाबत लक्ष ठेवून आहेत.