बदलापूर : गेले दोन दिवस चिमूरड्यांच्या अत्याचार (Badlapur Rumor) प्रकरणी बदलापूरसह महाराष्ट्रात संतांपाचे वातावरण सुरू आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बदलापूर येथे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. परंतु, सोशल मिडियावर सध्या एक अफवा पसरत असल्याचे समोर आले आहे. ज्या दोन मुलींवर हा अत्याचार झाला त्यातील एका मुलीचा मृत्यू झाला असून एका आईने आत्महत्या केल्याचे पसरवले जात आहे. परंतु, ही पूर्णपणे अफवा असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात पीडित कुटुंबीयांसोबत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संगीता चेंदवणकर यांनी एका वृत्तवाहिनीला खरी माहीती दिली आहे, त्यांनी सांगितले की या दोन चिमुकल्यांची तब्येत व्यवस्थित आहे आणि कुटुंब देखील व्यवस्थित आहेत. त्यांच्या सोबत संगीता चेंदवणकर सतत संपर्कात आहेत.
मुलीच्या मृत्यू प्रकरण राज्य सरकार लपवत असल्याचे देखील (Badlapur Rumor) पसरवले जात आहे. यामार्फत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नये तसेच हाती आलेली माहिती तपासूनच पुढे पाठवावी असे राज्य सरकार कडून आवाहन केले जात आहे.
Bigg Boss : जान्हवी किल्लेकरला पंढरीनाथ कांबळे यांच्या मुलीचे सडेतोड उत्तर; नेटकऱ्यांनी केले कौतुक