बांगलादेश : बांगलादेशात सुरू असलेल्या परिस्थितीचा (Bangladesh Violence) आता हिंदुवर परिणाम होताना दिसत आहे. बांगलादेशात मुस्लिम समाजाने हिंदूंवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. कुठे जीवंत माणसांना जाळून टाकले जात आहे तर कुठे मंदिराची तोडफोड करण्यात येत आहे. यामध्ये सुमारे 100 हिंदूंची हत्या करण्यात आली आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बांगलादेशात खळबळ उडाली होती. लोकांचा आक्रोश पाहता शेख हसिना आपला देश सोडून पळून आली. भारताने शेख हसिनाला आश्रय दिला. शेख हसिनाच्या जाण्याने देखील तेथील परिस्थिती बदलली नसून त्यांच्या पक्षातील लोकांना आणि समर्थकांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेतच. परंतु, कोणत्याही प्रकारची चूक नसताना निष्पाप हिंदुचा बळी घेतला जात आहे. या संघर्षात आतापर्यंत किमान 100 जणांचा मृत्यू झाला आहे.
SET Exam : सेट परिक्षेचा निकाल जाहीर; 7273 विद्यार्थी पात्र
आंदोलक वाईट प्रकारे हिंदूंना लक्ष्य करत आहेत. रविवारी झालेल्या भीषण (Bangladesh Violence) चकमकीत 14 पोलिसांसह 100 जण ठार झाले, तर शेकडो जण जखमी झाले आहेत. कट्टरवाद्यांनी हिंदूंवर आणि मंदिरांवर हल्ले केले आहेत. इस्कॉन आणि काली मंदिरांसह हिंदूंच्या घरांना लक्ष्य करण्यात आले. हिंसा पाहून भाविकांनी एका हॉटेलमध्ये आश्रय घेतला. परंतु, ते हॉटेलही मुस्लिमांनी जाळून टाकले. यामध्ये 7 हिंदू जीवंत जाळले गेले.
अशा परिस्थितीत भारत सरकारने एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. भारताने लोकांना प्रवास टाळण्यास सांगितले आहे. सध्या बांगलादेशमध्ये इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद करण्यात आले आहे, संपूर्ण देशात कर्फ्यू लागू आहे.