Hindakesari News : आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित (Bhide Guruji) गडकोट धारातीर्थ मोहिमेस प्रारंभ झाला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी वर्षभर ज्या क्षणाची वाट पाहतात तो क्षण आज आला. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून गडकोट धारातीर्थ मोहिमेला धारकरी येतात. हर एक गावातील तरुण मोहिमेला आलाच पाहिजे यासाठी आ.संभाजीराव भिडे गुरुजी प्रत्येक जिल्हा अनवाणी पायाने पिंजून काढतात आणि त्याचे फळ म्हणजे गडकोट मोहिमेतील लाखोंची संख्या. आजपासून ते ११ फेब्रुवारी पर्यंत ही मोहीम असणार आहे. यंदाची मोहीम नरवीर श्रीतानाजीराव मालुसरे समाधी (उमरठें) ते भगवान श्रीशिवछत्रपती समाधी श्रीरायगड (मार्गे श्री नरवीर मुरारबाजी देशपांडे समाधी) अशी आहे. दरवर्षी ही मोहीम भिडे गुरुजी का आयोजित करतात हे जाणून घेऊया.
का आणि कशासाठी याचे उत्तर एकच ते म्हणजे शिवाजी-संभाजी रक्तगट असणारी तरुण पिढी उभी करण्यासाठी. जे मोहिमेत जातात ते त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विद्यापीठात नाहून निघतात. जे मोहिमेत जातात ते जगण्या-मारण्याचा हेतू शिकून बाहेर पडतात. शिस्तबद्ध जीवनाचा आदर्श म्हणजे गडकोट मोहीम. आपल्या गरजा ओळखण्याचा अनूभव म्हणजे मोहीम. असे भिडे गुरुजी (Bhide Guruji) सांगतात.
शिवछत्रपतींचे स्मरण म्हणजे आपले जीवन आणि त्यांचे विस्मरण म्हणजे आपले मरण आणि या दोहोंची जाणीव म्हणजेच मोहीम.
जर आपल्या हिंदवी स्वराज्याचे पौरुषत्व जिवंत ठेवायचे असेल तर शिवरायांचा हा वारसा जपणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य केवळ स्थापन केलंच नाहीतर त्यांनी ते सांभाळलं. आज त्यांचा हा वारसा सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे. त्यांचा वारसा म्हणजे नेमकं काय? तर त्यांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य आणि ज्या गड किल्ल्यांच्या माध्यमातून ते स्थापन झालं ते गड किल्ले.
या टकुर फिरलेल्यांची माथी जाग्यावर आणायचे काम कोणी करत असेल तर धारातीर्थ गडकोट मोहीम. आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठीच (Bhide Guruji) गुरुजींनी मोहीम हा मार्ग सांगितला आहे. कसे मरावे आणि कसे जगावे यासाठीच श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान आयोजित धारातीर्थ मोहीम हा एकमेव उपाय आहे. असे भिडे गुरुजी सांगतात.