Big Boss : बिग बॉस OTT 3′ च्या विजेत्याची सर्वांनाच आतुरता होती. धमाकेदार, मसालेदार असा ठरलेल्या बिग बॉस OTT 3मध्ये सना मकबूलने नेझीला पराभूत करून विजय मिळवला. रणवीर शौरी, साई केतन राव, सना मकबूल, नाझी आणि कृतिका मलिक हे शेवटचे 5 फायनलिस्ट होते. विजेत्याला 25 लाखांचे रोख बक्षीस मिळाले.
बिग बॉस हिंदीतले स्पर्धक नाचले मराठमोळ्या संजूच्या गाण्यावर…
बिग बॉस ओटीटी 3 च्या फिनालेदरम्यान, सना आणि नाझी यांनी त्यांची घट्ट मैत्री व्यक्त केली. त्यांनी एकत्र सादरीकरणही केले. घरातील सहकाऱ्यांनी नाझीला सनावर विश्वास ठेवू नये असा इशारा दिला असला तरीही, त्यांचे नाते काळाबरोबर अधिक घट्ट होत गेले. सनाने सतत नेझीला पाठिंबा दिला आणि त्याच्या पाठीशी उभी राहिली. त्याला आपले मत व्यक्त करण्यास मदत केली.