मुंबई : बिग बॉस मराठी सीझन 5 सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला (Bigg Boss) आहे. काही अभिनेत्री स्वत:च्याच इंडस्ट्रीमधल्या दिग्गज आणि महाराष्ट्रासाठी आदर्श असणाऱ्या कलाकारांचा अपमान करत आहेत. निक्की तांबोळी ही पहिल्या दिवसांपासूनच वादात होती; पण आता तिच्याच पावलांवर पाऊल ठेवत अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान केला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यावर टीका होत आहे. यामध्येच आता पंढरीनाथ कांबळे यांची लेक ग्रीष्मा हिने वडिलांची बाजू मांडल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रीष्मा म्हणाली, की प्रिय “अभिनेत्री” @jahnavikillekar, जितकं स्पष्ट तू स्वतःचं नाव उच्चारत नसशील तितकं स्पष्ट आणि आदराने बाबा तुझं नाव घेतो. मुखावाटे बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, महत्त्व, वजन आणि टायमिंग या गोष्टींची समज आणि भान @paddykamble ला आहे हे त्याने सिद्ध केलं आणि म्हणूनच तुझ्या अपमानाला कोणतीही मर्यादा नं ओलांडता अगदी संयमाने योग्य असं उत्तर दिलं.
खरतर “overacting” हा शब्द तुझ्या तोंडून निघणं हे हास्यास्पद आहे. हे बघ साधी गोष्ट आहे, contestents च्या घरात सुरू असलेल्या गेम बद्दल तू हवं तेवढा बोलू शकतेस पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यासाठी especially @varshausgaonker aani @paddykamble च्या career वर बोलण्याआधी तुला त्यांच्या एवढी मराठी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख कमवावी लागेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या असंख्य प्रेक्षकांची मनही जिंकावी लागतील. कारण नसताना सतत आपल्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या लोकांविषयी अनादर करणं हा गेम नाही.
मुळात समोरच्याचा अपमान करणं हा बाबाचा स्वभाव नाही. तुझ्या पातळीला न उतरून त्याने स्वतःची, गेमची आणि विशेष म्हणजे तुझी प्रतिष्ठा राखली आहे. संतापात डोक्याचा ताबा हरवून मनाला वाट्टेल ते बोलणारी तू @nikki_tamboli ची सावलीच आहेस.
जेव्हा (Bigg Boss) गेम बाहेर असलेल्या तुझ्या लेकराचा विनाकारण उल्लेख झाला तेव्हा तुला ते पटलं नाही….आज तू गेम बाहेरच्या, बाबाने लेकरा सारखाच वाढवलेल्या, फुलवलेल्या career विषयी एवढं बोललीस ते मात्र तुला पटलं !! हा तुझा “Fair Game” संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय एवढं लक्षात ठेव.
त्याच्या संस्कारात वाढली आहे मी, त्यामुळे जर माझ्या बोलण्यामुळे तुझ्या भावना (Bigg Boss) दुखावल्या असतील तर मी तुझी माफी मागते. माझा हेतू फक्त त्याची लेक म्हणून स्वतःचं मत मांडणं एवढाच आहे.
पंढरीनाथ कांबळे यांनी जान्हवीच्या वागण्याचा जितका संयमाने प्रतिकार केला तितक्याच संयमाने ग्रीष्माने बाजू मांडल्याने तिचे कौतुक होत आहे. तर सध्या मराठी इंडस्ट्रीमधून देखील जान्हवीवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे.