दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (Budget 2024) मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नियोजित वेळेनुसार अर्थमंत्री सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात करतील. अर्थमंत्र्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली. यानंतर त्या अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत पोहचल्या आहेत. विशेषत: मध्यमवर्गीय, शेतकरी, नोकरदार आणि महिलांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या मोदी सरकारच्या उद्दिष्टाची झलक या अर्थसंकल्पातही पाहायला मिळणार आहे.
मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात मोठ्या सुधारणा अपेक्षित आहेत
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सातवा अर्थसंकल्प सादर (Budget 2024) करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रात रूपांतरित करण्याच्या रोडमॅपची झलक देऊ शकतो. केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी जास्त वाटप, कर सुधारणा, पायाभूत सुविधांना चालना, स्थानिक उत्पादनावर भर, रोजगार निर्मिती, कौशल्य निर्मिती आणि अधिक श्रम-केंद्रित क्षेत्रांसह अनेक मुद्द्यांवर भर दिला जाण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांतील करदात्यांना फायदा होण्यासाठी आणि देशातील व्यवसाय करण्याच्या सुलभतेत सुधारणा करण्यासाठी आयकर रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. मूडीज ॲनालिटिक्सनुसार, बजेटमध्ये भांडवली खर्च वाढू शकतो.
Mumbai : मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मोठा निर्णय
कॅबिनेट बैठक लवकरच सुरू होईल
संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काही वेळापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत (Budget 2024) केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाणार आहे. त्यानंतर अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर ठेवला जाईल. सीतारामन सकाळी 11 वाजता सभागृहात अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील.