नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 या आर्थिक वर्षाचा (Budget 2024 Live) संपूर्ण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करत आहेत. मात्र यामध्ये मध्यमवर्गाची निराशा झाली आहे. सीतारामन यांनी आयकर स्लॅबमध्ये कोणतेही बदल जाहीर केलेले नाहीत. त्या म्हणाल्या, की त्यांनी 1961 च्या आयकर कायद्याचा सर्वसमावेशक आढावा जाहीर केला आहे. यासाठी सहा महिने लागतील.
आयकर वाढीची घोषणा –
नवीन कर प्रणालीमध्ये मानक वजावट वाढून 75 हजार रुपये झाली. पर्सनल टॅक्समध्ये अर्थमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. अर्थमंत्र्यांनी स्टँडर्ड डिडक्शन 50 हजारांवरून 75 हजार रुपये केले. याशिवाय 0 ते 3 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही, तर 3 ते 7 लाखांपर्यंत 5 टक्के कर लागेल.
अर्थमंत्री आयकरावर काय म्हणाल्या?
आयकर प्रक्रिया सुलभ करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की दोन तृतीयांश लोकांनी नवीन कर प्रणाली निवडली. भांडवली नफा कर सुलभ करण्याचा प्रस्ताव आहे. भांडवली नफ्याची मर्यादा वाढवली जाईल. यासह, टीडीएस थकबाकी प्रक्रिया सुलभ केली जाईल. टीडीएस वेळेवर न भरणे हा गुन्हा ठरणार नाही, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
Budget 2024 Live : खुशखबर! मोबाईल फोनच्या कस्टम ड्युटीमध्ये 15 टक्के घट