सिल्लोड : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे (Chatrapati Sambhajinagar) महिला सशक्तीकरण योजना आणि लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांचे स्थानिकांनी अभूतपूर्व असे स्वागत केले.
यावेळी जागोजागी भव्य पुष्पहार लावून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच महिलांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत राख्या बांधल्या. लाडकी बहीण योजना ही खेडोपाडी पोहोचली असून मुख्यमंत्री म्हणून महिलांना आर्थिक दृष्ट्या आत्मसन्मान मिळवून देणारी योजना सुरू केल्याबद्दल महिलांनी यावेळी महायुती सरकारचे मनापासून आभार मानले.
या निमित्ताने सिल्लोड शहरात अतिभव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. सिल्लोडमधील (Chatrapati Sambhajinagar) आबालवृद्ध या मिरवणुकीत सामील झाले होते. त्यांनी माझ्यावर आणि महायुती सरकारवर दाखवलेला हा विश्वास नक्की सार्थ ठरवू आणि विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळवून देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
यावेळी सिल्लोडचे आमदार, मंत्री आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे देखील उपस्थित होते.