छत्रपती संभाजी नगर : लोकसभा निवडणुकीत 13 जागा जिंकून राज्यातील (Maharashtra Assembly) सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाने छत्रपती संभाजी नगर येथे आढावा बैठक व खासदार सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पक्षासाठी काम करणाऱ्या मेहनती नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे स्पष्ट केले.
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आघाडी सरकारवर निशाणा साधला. पटोले म्हणाले की, सध्याचे सरकार जाणे निश्चित आहे. विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुती सरकारने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. विधानसभा निवडणूक ही राज्याचा स्वाभिमान जपण्याची विधानसभेची लढाई आहे.
Maharashtra Assembly : मविआला मोठा धक्का! अबू आझमी यांची मोठी घोषणा; 12 जागांवर निवडणूक लढवणार
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly) काँग्रेस महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, त्यामुळे जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळाला. 2019 मध्ये काँग्रेसकडे राज्यात फक्त एकच खासदार होता, पण 2024 मध्ये त्याचे 14 खासदार असतील (सांगलीतील विशाल पाटील यांच्यासह). आपण लोकसभेत जिंकलो, विधानसभेलाही तेच करायचे आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी मेहनत घेतलेल्या निष्ठावंत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे चेन्निथला यांनी सांगितले.