Hindakesari News : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly Election) जेमतेम तीन महिने उरले आहेत. त्याआधी आज आम आदमी पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 11 उमेदवारांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टीची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था PAC ची आज बैठक होत आहे. पीएसीच्या बैठकीत दिल्ली विधानसभा 2025 च्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. बैठकीत ‘आप’च्या वरिष्ठ नेत्यांनी आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली.
आम आदमी पार्टीच्या पहिल्या यादीत 11 उमेदवारांची नावे – Delhi Assembly Election
ब्रह्मसिंह तंवर – छतरपूरमधून .
अनिल झा – किरारी
दीपक सिंग – विश्वास नगर
सरिता सिंह – रोहतास नगर
बीबी त्यागी – लक्ष्मीनगर
राम सिंह – बदरपूर
झुबेर चौधरी – सीलमपूर.
वीरसिंह धिंगण – सीमापुरी
गौरव शर्मा – घोंडा
मनोज त्यागी – करावल नगर
सोमेश शौकीन – मतियाळा
येणाऱ्या आगामी वर्षात फेब्रुवारीमध्ये दिल्ली विधानसभेच्या 70 जागांवर निवडणुका होणार (Delhi Assembly Election)आहेत. आम आदमी पार्टी आपल्या तयारीसाठी पूर्ण उत्साहाने काम करत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.
Maharashtra Assembly Election : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री बनणार!