मुंबई : धारावी येथे काल झालेल्या हत्या प्रकरणात आणखी (Dharavi) एक मोठी बातमी समोर आली आहे. मृत्यू झालेल्या अरविंद वैश्य याच्या शांततेत निघालेल्या अंत्ययात्रेवर मुस्लिम समाजाने दगडफेक केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मरणोत्तर देखील मृत व्यक्तीची विटंबना होणे ही अत्यंत अमानविय आणि धक्कादायक गोष्ट आहे.
धारावी येथे मित्राच्या वादात मध्यस्थी केल्याने त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या समोरच त्याची हत्या झाली. या बाबतीत एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये अरविंदच्या आईने सांगितले की रविवारी तेरावीचे एडमिशन केले होते. माझा मुलगा अत्यंत साधा होता. त्याचा दुसऱ्याच्या वादात नाहक बळी गेला. तो तर वाद सोडवण्यासाठी गेला होता. तर त्याच्या बहिणीने सांगितले, की माझ्या भावाला अत्यंत निर्दयी पणे मारले आहे. त्याच्या छातीत एकदा नाहीतर तीनदा चाकू खुपसला. अरविंदच्या वडिलांनी सांगितले, की माझा केवळ 24 वर्षांचा कमवता मुलगा आमच्यातून निघून गेला.
हा वाद केवळ पोलिस स्टेशन पर्यंत थांबला नाही किंवा हत्येपर्यंत थांबला (Dharavi) नसून अरविंदच्या अंत्ययात्रेवर देखील दगडफेक केल्याचे त्याच्या बहिणीने सांगितले आहे.
कुटुंबियांची मागणी –
हे कुटुंब सरकारकडून न्यायची अपेक्षा करत आहेत. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे, की आम्हाला आरोपीचा जामीन नको. फक्त ज्या हाताने त्याचा खून करण्यात आला; ते हात कापून टाकावे अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
आरोपी पकडले असले तरीही अंत्ययात्रेवर दगडफेक झाल्याने अधिकच तणावाचे वातावरण पसरले आहे.