हिंदकेसरी न्यूज : धुळे येथे दिनांक 7 मार्च रोजी (Dhule) शिरपूर तालुक्यात शिवाजी महाराज यांच्या आक्षेपार्ह कमेन्ट केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास गेलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्या प्रकरणी पोलिस निरीक्षक कातीलाल पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांची 8 मार्च रोजी तात्काळ बदली करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याच्या बदली पोलिस उपनिरीक्षक जयपाल हीरे यांची शिरपूर शहर पोलिस ठाण्याचा अतिरिक्त कारभार सोपवण्याचे आदेश पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवर यांनी दिले आहेत.
सविस्तर माहिती अशी, की शिरपूर येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ता आकाश सुतार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोस्ट केली होती. या पोस्टवर फरदीन जावेद पटेल आणि अन्य मुस्लिम धर्मियांनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्या. यासाठी कायदेशीर मार्गाने जाण्यासाठी उदय चौधरी, आणि अन्य कार्यकर्ते शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फरदीन विरोधात तक्रार दाखल करण्यास गेले. सर्व कायदेशीर प्रक्रिया शांततेत सुरू असतानाही अचानकपणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शिरपूर तालुका अध्यक्ष जयेश पाटील यांना पोलिस उपनिरीक्षक कातीलाल पाटील यानी बेदम आणि अमानुष मारहाण करत शिवीगाळ केली.
या प्रकरणी आता फर्दीन जावेद आणि अन्य गुन्हेगारांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर कांतीलाल पाटील याच्यावर देखील तक्रार दाखल करून निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.