हिंदकेसरी न्यूज : धुळे येथे काल दिनांक 7 मार्च रोजी (Dhule) शिरपूर तालुक्यात शिवाजी महाराज यांच्या आक्षेपार्ह कमेन्ट केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास गेलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक कातीलाल पाटील याची तात्काळ बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच्या बदली पोलिस उपनिरीक्षक जयपाल हीरे यांची शिरपूर शहर पोलिस ठाण्याचा अतिरिक्त कारभार सोपवण्याचे आदेश पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवर यांनी दिले आहेत.
सविस्तर माहिती अशी, की शिरपूर येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ता आकाश सुतार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोस्ट केली होती. या पोस्टवर फरदीन जावेद पटेल आणि अन्य मुस्लिम धर्मियांनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्या. यासाठी कायदेशीर मार्गाने जाण्यासाठी उदय चौधरी, आणि अन्य कार्यकर्ते शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फरदीन विरोधात तक्रार दाखल करण्यास गेले. सर्व कायदेशीर प्रक्रिया शांततेत सुरू असतानाही अचानकपणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शिरपूर तालुका अध्यक्ष जयेश पाटील यांना पोलिस उपनिरीक्षक कातीलाल पाटील यानी बेदम आणि अमानुष मारहाण करत शिवीगाळ केली.
UP : ज्यांना रंगांचा त्रास त्यांनी होळीला बाहेर पडू नका; पोलिस अधिकारी अनुज चौधरी यांचे विधान
या घटने विरोधात आज धुळे शहरात निषेध मोर्चा देखील काढण्यात (Dhule) आला. यावेळी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच अनेक हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.
मुलीची छेड काढणाऱ्या टोळक्याने तिच्या कुटुंबीयांना अमानुष मारहाण | Chhatrapati Sambhaji Nagar