Hindakesari News : महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यावर पुढची पायरी मुख्यमंत्री पदाची होती. फडणवीस का शिंदे? अशा चर्चेला उधाण आल्यावर अखेर आज एकनाथ शिंदे यांनी आपले स्पष्ट मत मांडले. भाजपचा निर्णय मान्य असेल असे त्यांनी जाहीर तर केलेच पण त्यांना अश्रू अनावर झाले. मुख्यमंत्री पदा पेक्षा लाडक्या बहिणींनी दिलेला मान मोठा असं त्यांनी सांगितले.
मी सुद्धा शेतकरी कुटुंबातून आलो आहे. मी कसं काट कसर करायचो. माझ्या आईबद्दल मी भाषणात नेहमी सांगितलं. लाडके भाऊ असेल, बहिणी असतील, यांचा सगळ्यांचा विचार केला. अडीच वर्ष आम्ही काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पाठिंबा दिला आहे. मी समाधानी आहे. आता सगळे जण म्हणत होते, कुठे गेले. कुठे बसले. पण एक सांगतो मी नाराज नाही. आम्ही लढणारे लोक आहोत. लढून काम करणारे आहोत. एवढा मोठा विजय मिळाला आहे. आतापर्यंतच्या विजयामुळे याची गणना ऐतिहासिक होत आहे. जीवतोडून मेहनत घेतली, काम केलं, लोकांमध्ये गेलो.
लोकांमध्ये जाऊन काम करणारं सरकार आहे. माझ्या शरिरात रक्ताचा थेंब असेपर्यंत जनतेसाठी काम करणार आहे, असं शिंदे म्हणाले.‘मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं यात माझा आनंद आहे. बहिणींना पैसे मिळाले. औषध, फीचे पैसे मिळाले आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये जनतेचं प्रेम मिळालं, त्यांना वाटतंय, जनतेला मुख्यमंत्री आहे. जनतेतला मुख्यमंत्री म्हणून ओळख मिळाली, याला खूप नशीब लागतंय. लोकप्रिय मुख्यमंत्री माध्यमांनीच ओळख दिली.
मी जनतेसाठी काम केलं. लाडक्या बहिणींना भाऊ ही पदवी मला मुख्यमंत्रिपदापेक्षा खूप मोठी आहे, असं म्हणताना शिंदे यांना गहिवरून आलं.‘राज्याला पुढे जायचं असेल तर केंद्राची ताकद आपल्यासोबत आहे. केंद्राची मदत कायम लागणार आहे. आता राज्यात जे काही बहुमत मिळालं आहे. कुठे घोड आडलं आहे, मी काहीही धरू ठेवलं नव्हतं.
कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ पद मिळालं आहे. मी काल पंतप्रधान मोदींना फोन केला आणि सांगितलं सरकार बनवताना कोणती अडचणीचं काही आहे तर माझ्यामुळे कुणामुळे तर कधी मनात आणू नका. अडीच वर्ष संधी दिली. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या, तो निर्णय आम्हाला मान्य असेल. एनडीएचे प्रमुख म्हणून मान्य असेल’ असंही शिंदेंनी स्पष्ट केलं.