Hindakesari News : देव तारी त्याला कोण मारी? याचे उदाहरण (Elephanta Boat Accident) काल दिनांक १८ डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेत बचवलेल्या एका कुटुंबाच्या कहाणीतून सिद्ध झाले आहे. मुंबई येथे बुधवारी एलिफंटा येथे प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने प्रवासी बोट बुडाली. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. तर ९९ जणांना वाचवण्यात यश आले आहे. अद्याप काहीजण बेपत्ता असल्याचेही समजते. परंतु, या बोटीत न गेल्याने घटनेपासून एक कुटुंब बचावले आहे. जाणून घेऊया नेमके काय घडले?
गोरखपूर मधील त्रिपाठी कुटुंबीय मुंबई दर्शनासाठी आले. त्यांचाही इतरांसारखा एलिफंटा लेणी पाहण्याचा बेत होता. मात्र त्यांच्या मुलांनी मुंबईचा वडापाव खाण्याचा हट्ट केला. यामुळे ते सर्वजण नीलकमल फेरीबोटवर न चढता वडापाव खाण्यासाठी थांबले. आणि अपघातापासून बचवल्याचे (Elephanta Boat Accident) अंजली त्रिपाठी यांनी सांगितले.
Amit Shah : कॉँग्रेसची केली अमित शाह यानी बोलती बंद; राज्यघटना बदलण्यावरून शहा यांचे ‘सवाल पे सवाल’