दिल्ली : हल्ली रीलवर प्रसिद्ध होण्यासाठी व्हिडिओवर (Fake Reel ) खोटा संदेश टाकून तो व्हिडिओ व्हायरल केल्याचे प्रकार घडतान दिसत आहे. अनेकजण कोणत्याही प्रकारची शहनिशा न करता त्याला प्रसिद्धी देताना दिसतात. अशातच एका अल्पवयीन तरुणाचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्याला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. पण, त्याने आपल्या बहिणीच्या बलात्कारी आरोपीला मारल्याचा संदेश त्यावर लिहिलेला असून तो सध्या लोकांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. परंतु, ही कथा पूर्णपणे खोटी असून तो अट्टल गुन्हेगार आहे. जाणून घेऊया तो कोण आहे?
Maharashtra Assembly : ‘या’ तारखेला होऊ शकतात निवडणूका; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले..
अड्डू डिफॉल्टर या नावाने प्रसिद्ध असलेल्या या मुलाचे खरे नाव अब्दुल फैसल मोहम्मद आहे. ज्याचा जन्म 1998 मध्ये दिल्लीच्या वेलकम नगर भागात झाला होता. तो एक गुन्हेगारी मानसिकता असलेला गुंड आहे. जो दरोडा, खून आणि खंडणीच्या गुन्ह्यात गुन्हेगार आहे. पण त्याचे व्हिडिओ पसरवून लोकांच्या नजरेत त्याला मसीहा दाखवल्याचे समोर येत आहे.
लोकांनी सध्याच्या व्हिडिओच्या फसव्या जगात भुलून न जाता येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची शहानिशा करून व्हिडिओ पुढे (Fake Reel) पाठवावे. आपल्या आजाणतेपणामुळे आपण समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना देत नाही याची खात्री करावी.