महाराष्ट्र : वर्षभर ज्या उत्सवाची पुणे आणि मुंबई तसेच संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत असतो त्या उत्सवाची (Ganpati Visarjan) आज सांगता होताना पुणेकर तसेच मुंबईकरांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. पुण्यातील पाच मानाचे गणपती तसेच सुवर्ण राजा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजासह अनेक मोठे गणपती विसर्जनांसाठी सज्ज झाले आहे. आपल्या बाप्पाला ढोल ताशाच्या गजरात निरोप देण्यासाठी मुंबई आणि पुणे सज्ज झाले आहे.
मिरवणूक सुरू झाल्यापासून पाच तास उलटून गेल्यावर पहिला मानाचा कसबा गणपती अलका चौकात पोहचला आहे, त्यामुळे दरवर्षी प्रमाणे विसर्जन मिरवणुका उशिरापर्यंत चालणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गणपत्ती बाप्पाचे समुद्रामध्ये विसर्जन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांसाठी महत्वाचा अलर्ट आहे. आज रात्री 11 वाजता समुद्राला भरती येणार आहे. त्यामुळे या कालावधीत भाविक भक्तांनी समुद्र किनारी जाणे धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे भरतीपूर्वीच गणेशोत्सव मंडळांनी गणपती विसर्जन करण्याची शक्यता आहे.