Hindakesari News : गेले अनेक (Ghatkopar) दिवस बांगलादेशमध्ये हिंदूंच्या चाललेल्या नरसंहाराविरोधात आता भारतात आणि महाराष्ट्रात हिंदू पेटून उठत आहेत. या नरसंहार आणि स्वामी चिन्मय दास यांच्या अटके विरोधात घाटकोपर येथे हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी काळ्या फिती लावून, हातात मशाल आणि भगवा घेऊन शेकडो हिंदू एकवटले.
घाटकोपर येथील विक्रांत सर्कल ते घाटकोपर रेल्वे स्टेशन असा हा मोर्चा होता. यावेळी बांगलादेशाविरोधात घोषणा करण्यात आल्या तर मोहम्मद युनूसचे नोबल काढून घ्या, हिंदूंवर बांगलादेशमध्ये होणारे अत्याचार थांबवा, तर हिंदूना न्याय द्या अशा घोषणा (Ghatkopar) आणि मागणी करण्यात आली.
Eknath Shinde : सीएम पदापेक्षा लाडक्या बहिणींनी दिलेला मान मोठा: एकनाथ शिंदे गहिवरले!