पुणे : आज आणि उद्या शनिवार (Pune) तसेच रविवार असल्याने अनेकजण पुण्याला पर्यटनासाठी जाणे पसंत करतात. जर तुम्ही या दिवसांत पुण्याला जाणार असाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. कालपासून पुणे आणि मुंबई भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुन्हा हवामान खात्याकडून रेड आणि ऑरेंज अलर्टची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अनेक पर्यटक ताम्हीणी घाटात आणि गड किल्ल्यांवर जाणे पसंत करतात. परंतु, काल पासून ताम्हीणी घाट बंद करण्यात आला आहे.
ताम्हिणी घाटातील आदरवाडी व डोंगरवाडी येथे अतिवृष्टीमुळे रस्त्याला तडा गेल्याने तेथील रस्ता खचला आहे. यामुळे शुक्रवार 2 ऑगस्ट ते 5 ऑगस्टपर्यंत हा रस्ता बंद करण्यात आला आहे. तर सिंहगडावर जाणाऱ्या घाट रस्त्यात डोंगराचा मोठा भाग झाडांसह कोसळून रस्त्यावर आल्याने सिंहगड आणि खडकवासला या भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
या सोबतच घडत असलेल्या दुर्घटना आणि मुसळधार पाऊस पाहता मावळ भागातील भुशी (Pune) धरणसह पवना धरण, टाटा धरण, अशी अनेक धरणे, गड-किल्ले, लोणावळा पर्यटक ठिकाणे, लायन्स पॉईट, राजमाची पॉईट, खंडाळा, सहारा ब्रिज परिसरात 31 ऑगस्ट पर्यंत जिल्हाधिकारी परिसरात निर्बंध असतील.