जपान : जपानमध्ये पुन्हा एकदा भुंकपाचे धक्के अनुभवायला मिळाले (Japan Earthquake) असून यामुले पुन्हा एकदा त्सुनामीचा इशारा देखील देण्यात आला आहे. जपानच्या दक्षिणेला असलेल्या क्युशू बेटावर 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. भूकंपामुळे क्युशू बेटाच्या पूर्व आणि दक्षिणेकडील किनारपट्टी तसेच शिकोकूच्या दक्षिणेकडील किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, गुरुवारी सकाळी जपानच्या दक्षिणेकडील क्युशू बेटावर एकापाठोपाठ एक दोन मोठे भूकंप झाले. पहिला भूकंप 6.9 रिश्टर स्केलचा होता. त्यानंतर काही वेळातच दुसरा भूकंप झाला, ज्याची तीव्रता 7.1 होती.
Paris Olympic : कुस्तीपटू अंतिम पांघलवर ऑलिम्पिकमधून तीन वर्षांची बंदी; भारतासाठी लाजिरवाणी कृत्य
भूकंपाच्या हालचालींमुळे, जपान हवामान संस्थेने (JMA) बेटाच्या किनारी भागासाठी (Japan Earthquake) त्सुनामीचा इशारा जारी केला. जपान हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, भूकंपाची प्राथमिक तीव्रता 7.1 होती आणि त्याचा केंद्रबिंदू जपानच्या दक्षिणेकडील मुख्य बेट क्यूशूच्या पूर्व किनारपट्टीपासून सुमारे 30 किलोमीटर खोलीवर होता. दोन भूकंपांमुळे क्यूशूच्या दक्षिणेकडील किनारपट्टी आणि जवळच्या शिकोकू बेटावर 1 मीटर इतक्या उंच लाटांचा अंदाज वर्तविण्याचा इशारा देण्यात आला आहे.