कामोठे : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व बृहन महाराष्ट्र योग परिषदेच्या (Kamothe) मान्यतेने रायगड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेत एस.एस.स्पोर्ट्स पनवेलने उत्कृष्ट कामगिरी करत वर्चस्व राखले तर गुरुकुल आरोग्य योगपीठ म्हसळा दुसऱ्या स्थानावर राहिला.
राधाई इंकसॅप स्कूल कामोठे येथे झालेल्या जिल्हा योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे उद्धाटन आणि पारितोषक वितरण शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू सागर सावंत, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष हरीश पयेर, सचिव उत्तम मांदारे, खजिनदार भास्कर म्हात्रे, क्रीडा संघटक हेमंत पयेर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हेमा कांबळे, किशोर शिताळे, बाळकृष्ण म्हात्रे, जय कांबळे, सागर शितकर, शेखर माळी, गीता कांबळे यांच्यासह खेळाडू व योगप्रेमी उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांची १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान अंमळनेर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
Dharavi : भररस्त्यात पोलिसांसमोरच ‘हिंदू’ तरुणाची हात कापून निर्घृण हत्या
वयोगटानुसार विजेत्या स्पर्धकांची नावे
पारंपारिक प्रकार :
१० ते १४ वर्ष मुले – गौरव गवळी- प्रथम, सोहम पटेल – द्वितीय, तनिष्क पवार- तृतीय
१० ते १४ वर्ष मुली- मानुज्ञा म्हात्रे- प्रथम, मेघना नायर – द्वितीय, दुर्वा दातुल- तृतीय (Kamothe)
१४ ते १८ वर्ष मुले – धनंजय गुंड, १४ ते १८ वर्ष मुली- निशा पाटील-प्रथम, निष्ठा वर्मा- द्वितीय, जान्हवी पवार- तृतीय
१८ ते २८ वर्ष पुरुष- सुरज तावडे- प्रथम, प्रतिक चौरे- द्वितीय, सागर सावंत- तृतीय
१८ ते २८ वर्ष महिला- चैत्राली पाटील-प्रथम, दिव्या खोत-द्वितीय, कृतिका पयेर- तृतीय
२८ ते ३५ वर्ष महिला – हेमांगी गाणेकर- प्रथम, श्रद्धा साळुंखे- द्वितीय, रुपाली मुळे- तृतीय
३५ ते ४५ वर्ष गट ब पुरुष- राजेंद्र म्हात्रे- प्रथम, विजय पटेल- द्वितीय, हर्षवर्धन कदम- तृतीय
३५ ते ४५ वर्ष गट ब महिला- सुनिता गुप्ता-प्रथम, आशा यादव- द्वितीय, सारिका चौधरी- तृतीय
४५ ते ५५ वर्ष गट क महिला- राजश्री कपूर
कालात्माक एकेरी प्रकारात सोहम पटेल, सेजल महाजन, पाखी झळके,अनन्या पाटील, निशा पाटील, प्रांशी पटेल तर दुहेरी प्रकारात सोहम पटेल, योग चव्हाण, अनन्या पाटील, जिज्ञासा घोडके, प्रांशी पटेल, निष्ठा वर्मा यांची तर तालात्मक प्रकारात सेजल महाजन, मानुश्री सावंत, कृतिका पयेर, दिव्या खोत, प्रांशी पटेल, निष्ठा वर्मा यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी समाजसेवक प्रदीप भगत व सचिन तांबोळी यांचे विशेष सहकार्य लाभले.