कराड : साताऱ्यातील कराड तालुक्यातून (Karad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेडिकल कॉलेजमध्ये शिकाणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या प्रेयसीला इमारतीवरून ढकलले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यामध्ये विद्यार्थी देखील जखमी झाला आहे. पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा येथे राहणारा ध्रुव चिक्कार हा कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. ध्रुव हा कॉलेजजवळील सनसिटी बिल्डिंगमध्ये राहत होता. याच कॉलेजमध्ये त्याची प्रेयसी आरुषी देखील शिकत होती. त्यांची गेले दोन-तीन वर्षांपासून ओळख होती.
UPI : तुम्ही जर HDFC बँकेचे UPI युजर आहात तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी; नक्की वाचा!
आरोपी ध्रुवने आरुषीला त्याच्या फ्लॅटवर बोलावले. तेथे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. तिचे दुसरीकडे प्रेमप्रकरण सुरू असल्याचा त्याला संशय होता. या रागात ध्रुवने आरुषीला दुसऱ्या मजल्यावरून ढकलले. ती खाली पडताच तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी ध्रुव याला रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ध्रुवविरुद्ध कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी (Karad) या प्रकरणाबाबत सांगितले की, मुलगा आणि मुलगी दोघेही सुमारे दोन-तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात काही वाद झाले. त्यामुळे वादात धक्काबुक्की झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.