केरळ : वायनाड जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर भूस्खलनाची (Keral) घटना घडली. यामध्ये 164 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याशिवाय सुमारे 191 लोक बेपत्ता आहेत.
ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध घेण्याची मोहीम अजूनही सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूस्खलनानंतर 180 हून अधिक लोक बेपत्ता आहेत आणि मुंडक्काई आणि चुरलमला भागात 300 हून अधिक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. मृतांपैकी 75 जणांची ओळख पटली असून 123 मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे.
हे मृतदेह मेपाडी आरोग्य केंद्र आणि निलांबूर सरकारी रुग्णालयात (Keral) ठेवण्यात आले आहेत. लष्कर, नौदल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या बचाव पथके ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी (31 जुलै) केरळमधील वायनाड येथे झालेल्या भूस्खलनाच्या घटनेबाबत राज्यसभेत भाष्य केले. यावेळी अमित शाह यांनी केरळ घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. केरळ सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, अशी आपत्ती येण्याची शक्यता पाहता केरळ सरकार आधीच सतर्क होते. त्यांनी आरोप केला की सहसा अनेक राज्ये अशा इशाऱ्यांकडे लक्ष देतात, पण केरळ सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.