कोलकाता : आरजी कार हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर सामूहिक (Kolkata Breaking) बलात्कार प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे. या डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाला आहे का? असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे. या प्रकरणी आतापर्यंत केवळ एकाला अटक करण्यात आली आहे. बलात्काराच्या घटनेत एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग असेल तर कोणालाही अटक का झाली नाही? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. डॉक्टरवर ‘सामूहिक बलात्कार’ झाला नसल्याचा दावा सीबीआयच्या अहवालात करण्यात आला आहे. या गुन्ह्यात फक्त एकाच व्यक्तीचा सहभाग होता. सीबीआयने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात तपासाचा सद्यस्थिती अहवाल सादर केला. अटक केलेला संजय या घटनेशी संबंधित असल्याचा दावा सीबीआयच्या अहवालात करण्यात आला आहे.
अहवालात 150 ग्रॅम वीर्य असल्याचा उल्लेख नाही –
मृत डॉक्टरच्या शरीरातून सुमारे 150 ग्रॅम वीर्य सापडले असून, या घटनेत एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालात 150 ग्रॅम वीर्य मिळाल्याचा उल्लेख नाही. शवविच्छेदन अहवालात असे म्हटले आहे की डॉक्टरांच्या एंडोसर्विकल कॅनालमध्ये गडद पांढरा द्रव आढळला. मृत डॉक्टरच्या शरीरावर 16 जखमांच्या खुणा आहेत. डोके, गाल, नाक, आतील ओठ, डावा खांदा आणि हात, डावा गुडघा आणि खाजगी भागावर खुणा आढळल्या. फुफ्फुसात रक्ताची गुठळी झाली होती.
Badlapur Rumor: चिमुकल्यांची तब्येत आईसह व्यवस्थित; समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
या प्रकरणात अन्य अटक नाही
मात्र, सीबीआय हा अहवाल अंतिम मानत नाही. अनेक तज्ज्ञांकडून पडताळलेला हा फॉरेन्सिक (Kolkata Breaking) अहवाल सीबीआयला मिळणार असल्याची माहिती आहे. 13 ऑगस्ट रोजी सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. आठवडा उलटूनही या प्रकरणात दुसरी अटक झालेली नाही. मात्र, आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांपासून पीडितेच्या पालकांपर्यंत सर्वांनीच या घटनेत एकापेक्षा जास्त जणांचा हात असल्याचा संशय वारंवार व्यक्त केला आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि इतर अनेक पुराव्यांच्या आधारे संजयला अटक केली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय घटनेच्या दिवशी अनेक वेळा हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागाच्या इमारतीत प्रवेश करताना आणि बाहेर पडताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये डॉक्टरांचा मृत्यू झाला; त्यावेळी संजय हॉस्पिटलमध्येच (Kolkata Breaking) असल्याचे पुरावे मिळाले आहेत. याशिवाय संजयने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा कोलकाता पोलिसांनी केला आहे.