कोलकाता : कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये (Kolkata) एका ज्युनियर डॉक्टरसोबत घडलेल्या घृणास्पद घटनेनंतर देशभरातील डॉक्टर संतप्त झाले आहेत. या प्रकरणात आता पोस्टमॉर्टम अहवालात आणखी काही वेदनादायी खुलासे समोर आले आहेत.
कोलकाता बलात्कार प्रकरणातील पोस्टमॉर्टम अहवालात 5 खुलासे
1) असामान्य लैंगिकता आणि जननेंद्रियाच्या छळामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या खाजगी भागावर खोल जखमा आढळल्या.
२) आरडाओरडा थांबवण्यासाठी नाक, तोंड आणि घसा सतत दाबला गेला आहे ज्यामुळे थायरॉईड कार्टिलेज तुटला.
३) डॉक्टरने ओरडू नये म्हणून तिचे डोके भिंतीवर सतत आपटले गेले आहे. तिच्या पोट, ओठ, बोटे आणि डाव्या पायावर जखमा आढळल्या आहेत.
4) तिच्यावर एवढ्या जोरात हल्ला केला आहे की तिच्या चष्म्याचे तुकडे (Kolkata) डोळ्यात घुसले आहेत. दोन्ही डोळे, तोंड आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव झाला आहे.
5) तिच्या चेहऱ्यावर आरोपीच्या नखांच्या स्क्रॅचच्या खुणा आढळल्या आहेत. यावरून पीडितेने स्वतःला वाचवण्यासाठी खूप संघर्ष केला होता.
या प्रकरणात आता 2012 मध्ये दिल्लीतील सामूहिक बलात्कार पीडित निर्भयाच्या आईने या भयंकर घटनेवर प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ममता बॅनर्जी यांचा राजीनामा मागितला आहे. ही परिस्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरल्याचे निर्भयाच्या आईने म्हटले आहे. त्या पुढे म्हणाल्या की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आंदोलन करून लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.