Hindakeasari News : राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आणि पुन्हा एकदा (Maharashtra Assembly Election) एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री बनणार असा दावा शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी केला आहे. दरम्यान आम्हाला गुवाहाटी २ करायची गरज लागणार नाही तर आम्ही नवीन ठिकाणी जाऊ असेही संजय शिरसाठ म्हणाले.
पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता!
राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. महायुतीचा प्रचार पॉझिटिव्ह होता, जनतेला प्रचार भावाला असल्याचे शिरसाट म्हणाले. कोणत्याही निवडणुकीत अपक्षांची संख्या ही 20 पर्यंत असते, ते कोण असतात तर ते बंडखोर असतात. त्यामुळं ते सत्ता येणाऱ्यांसोबत कल देत असतात. जर आम्हाला दोन चार अपक्षांची गरज पडली तर ते आमच्यासोबत येतील. अपक्ष आमच्या संपर्कात असल्याचे शिरसाट म्हणाले. एक्झिट पोलवर सर्व अंदाज (Maharashtra Assembly Election) पाहणे योग्य नाही, निकाल बाहेर येऊ द्या असेही संजय शिरसाट म्हणाले.