मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोग (ECI) आज महाराष्ट्र विधानसभेचे (Maharashtra Assembly) वेळापत्रक जाहीर करणार आहे. आज निवडणूक आयोग दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. महाराष्ट्रासोबतच झारखंड विधानसभेच्याही निवडणुका जाहीर होणार आहेत. महाराष्ट्रातील विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत आयोगाला याआधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अशा स्थितीत 21 नोव्हेंबरच्या आसपास मतदान होण्याची शक्यता आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात पार पडल्या. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात आयोगाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे.
SCO Summit : तब्बल 12 वर्षांनंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जाणार पाकिस्तानात!
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकूण जागांची संख्या 288 आहे. त्यापैकी 33 विधानसभेच्या (Maharashtra Assembly) जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. याशिवाय 14 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढले होते. भाजपला 106, शिवसेनेला 56, राष्ट्रवादी काँग्रेसला 53 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. अपक्षांना 13, वंचित बहुजन आघाडीला 3 आणि AIMIM ला दोन जागा मिळाल्या. समाजवादी पक्षाने (एसपी) दोन जागा जिंकल्या, प्रहार जनशक्ती पक्षाने दोन जागा जिंकल्या, सीपीएमने एक जागा जिंकली आणि उर्वरित जागा काही लहान पक्षांना गेल्या.
अखेर आज निवडणुकांची प्रतीक्षा संपणार असून सर्वांचे लक्ष पत्रकार परिषदेकडे लागले आहे.