हिंदकेसरी न्यूज : अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Maharashtra Assembly) महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. यामुळे महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी 29 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तसेच 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक पहिल्या टप्प्याटच पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
महाराष्ट्रात 9.63 कोटी मतदार असतील. 4.97 कोटी पुरुष आणि 4.66 कोटी महिला मतदार असतील. 1.85 कोटी युवा मतदार असतील. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या 20.93 लाख असेल. यावेळी राज्यात 1,00,068 मतदान केंद्रे असतील.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना होतील (Maharashtra Assembly) आणि शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर आहे.