मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी (Maharashtra) बांधलेले गड-किल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. परंतु, त्यांच्या या प्रतिष्ठेचे नुकसार हल्ली तरुणाईकडून होत आहे. गड-किल्ल्यांवर दारू पिणे, ड्रग्ज घेणे आणि अन्य गुन्हेगारी गोष्टी घडत आहेत. यावर बंदी आणण्यासाठी शिंदे सरकारने आता ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करणाऱ्यांवर आता मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगटीवार यांनी माहिती दिली. यामध्ये गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्ज घेतल्यास यापुढे 2 वर्षांची शिक्षा व 1 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल असे जाहीर करण्यात आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले जात आहेत. अशातच आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता गड किल्ल्यांवर जाऊन दारू आणि ड्रग्जचे सेवन (Maharashtra) केल्यास मोठी शिक्षा होणार आहे.