महाराष्ट्र : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला (Maharashtra Rain) आहे. मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाने मुंबई शहर आणि उपनगरे जलमय झाली आहेत. नागपुरातही मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने विदर्भासाठी आज सोमवारी रेड अलर्ट जारी केला आहे. तर नागपुरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय राज्याच्या इतर भागातही मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी प्रशासनाने खबरदारी म्हणून यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विदर्भासाठी रेड अलर्ट
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती (Maharashtra Rain) आणि वाशीम जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. सखल भागात पाणी साचले आहे. याशिवाय लोकांच्या घरातही पाणी शिरले आहे. हवामान खात्याने भंडारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
Ajit Pawar : शरद पवार-अतुल बेनके भेटीवर अजित पवार यांची प्रतिक्रिया
मुंबईत जोरदार पाऊस
मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईसह कोकणातही पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज आहे. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. आज दिवसभर शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत पावसामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर लोकल ट्रेनची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे.
मराठवाड्यातही पावसाचा इशारा (Maharashtra Rain) मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा येथेही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.