जालना : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस. परंतु, हे उपोषण स्थगित करण्यात येणार असल्याची शक्यता समोर येत आहे. सलाईन लावून बेगडे उपोषण करण्यापेक्षा उपोषण न केलेले बरे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण –
अन्न-पाणी सोडून मनोज जरांगे पाटील अजूनही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण करत आहेत. परंतु, काहीही खात-पित नसल्याने त्यांची तब्येत ढासळत चालली आहे. यासाठी त्यांचे काळजी वाहणारे गावकरी आणि समर्थक यांनी त्यांना उपोषण मागे घेऊन उपचार घेण्याचा आग्रह धरला.
Sassoon Hospital : धक्कादायक! बेवारस अपंग रुग्णासोबत ससून रुग्णालयाच्या डॉक्टरचे अमानवी कृत्य
यावेळी जरांगे म्हणाले, की मी उपोषण करायला तयार आहे. मात्र, गावकऱ्यांनी उपचार घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही. विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे. सलाईन लावून मी उपोषण (Maratha Reservation) करायला तयार नाही. खोटं आणि बेगडी उपोषण मी करणार नाही. उपचार बंद करा मी उपोषण करायला तयार आहे, असंही जरांगेंनी पुढे म्हटलं आहे. तर सलाईन लावून पडून राहण्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं असंही जरांगेंनी म्हटलं आहे.
सरकार आमरण उपोषण शक्तीला घाबरत आहे. म्हणून मला उपोषण करू द्या असे मी गावकऱ्यांना म्हंटले. पण त्यांनी मला रात्री सलाईन लावले. आणि सलाईन लावून पडून राहण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं या मतावर मी आलो आहे. तिथे पडून राहण्यापेक्षा मी मतदार संघाची तयारी करेल असेही जरांगे म्हणाले.